DiscoverVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Claim Ownership

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Author: Vechleli Phule

Subscribed: 9Played: 22
Share

Description

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !!


'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.



Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

138 Episodes
Reverse
साथ नभाचीकापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत.1. ढग येतात कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण2 . साथ नभाची असेकवी - नलेश पाटीलकवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
पंधरा ऑगस्टपंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासात कोरलेला सुवर्ण दिवस. यासाठी लाखो लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हा सोनियाचा दिनु आपल्या भाळी आला. पण आपण सर्व त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नात आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग साजरा करूयात स्वातंत्र्यदिन.1. तिरंगा कवी - मिलिंद जोशीकवितासंग्रह - असेच होतं ना तुला ही...2. 15 ऑगस्ट कवी - अशोक बागवेकवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
अक्षरमौनएक चकारही न काढता ही अक्षरं बोलतात ना. या शब्दांना, अक्षरं , क्रियापदे यांना एक वेगळं वजन असतं. ते आपण कुठं, कधी आणि कसं वापरतो यावर आपण काही बनवू शकतो किंवा सगळं काही बिघडवू शकतो. चला तर मग त्यांची ताकद आजमवूया कवितांतून.1 . अक्षरमौनकवी - सौमित्रकवितासंग्रह - आणि तरिही मी...2. क्रियापदकवी - वसंत आबाजी डहाकेकवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
वास्तवआपण सर्वजण वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक निधड्या छातीने त्याचा सामना करतात आणि एक वेगळं जग निर्माण करतात जे त्यांच्या इच्छेनुसार चालतं. चला तर करुया वास्तवाशी चार हात.1. वास्तवकवी - मंगेश पाडगावकरकवितासंग्रह - शब्द2. वास्तवकवी - वसंत आबाजी डहाकेकवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
भोवरा कधी आपण याला फिरवतो तर तो कधी आपल्याला. भोवरे हे असतातच. खेळण्यातला भोवरा तर भाव खाऊन जातोच पण आयुष्यातले भोवरे ही काही कमी नसतात. चला तर एक गिरकी घेऊच कवितांच्या भोवऱ्यासोबत.1. भोवराकवी - के ना डांगे कवितासंग्रह - बालभारती2. भोवराकवी - इंदिरा संत कवितासंग्रह - निराकार Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
औदुंबरऔदुंबर ही जागा डोळ्यांना सुखावणारी तर आहेच पण मनालाही एक वेगळीच शांती तिथे मिळते. तो घाट, हिरवळ, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी, ती सुंदर मूर्ती यांनी आपण भारवून नाही गेलो तर नवलच. चला तर दंग होऊन जाऊया आपणही औदुंबर क्षेत्री.1. श्री क्षेत्र औदुंबर कवी - बा भ बोरकरकवितासंग्रह - कैवल्याचे झाड2. औदुंबरकवी - प्रकाश खोटेकवितासंग्रह - साधना Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
सिग्नल्स लाल, हिरवा, पिवळा, धोका, सावधान , पुढे जा अशी असंख्य सिग्नल्स रस्त्यावरती आणि आयुष्यात आपल्याला मिळत राहतात. काही आपला जीव वाचवतात, काही आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही आयुष्य पलटून टाकतात. चला तर बघुया कोणते सिग्नल्स मिळतायत ते.1. सिग्नल्सकवी - सौमित्रकवितासंग्रह- बाउल2. ग्रीन सिग्नलकवी - निरंजन उजागरेकवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
विठ्ठलाची ओटी लाखो भाविक ' जय हरी विठ्ठल ' च्या गजरात जरवर्षी हरवून जाऊन पंढरीला पोहचतात. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने त्यांना वेगळाच आनंद मिळतो. ती चंद्रभागा , तो सावळा विठ्ठल आणि ती पंढरी नेहमीच भक्तांना खुणावत असते. चला हरवून जाऊयात हरिनामाच्या गजरात.1. विठ्ठलाची ओटीकवी - वैभव जोशीकवितासंग्रह- म्हणजे कसं की..2. सांगताकवी - बा भ बोरकरकवितासंग्रह- कैवल्याचे झाड Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
दहावीच्या बाईस आपल्या सर्वांच्या शैक्षणिक काळामध्ये असे काही हाडाचे शिक्षक आपल्याला भेटतात की त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. कधी रागावतात, दटावतात, तर कधी प्रेमाने जवळ घेऊन कौतुकाची थापही पाठीवर देतात. अश्या आपल्या लाडक्या बाई, सरांसाठी काही कविता.1. प्रिय बाईसकवी - प्रवीण दवणेकवितासंग्रह - गंधखुणा 2. दहावीच्या बाईकवी - निरंजन उजगरेकवितासंग्रह - नवी घरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
झाला बेभान पाऊसपावसाळा कोणाला नाही आवडत ? त्याची भुरळ लहान- थोर सर्वांवरच पडते. तो या सृष्टीची अन् मनाचीही तहान भागवतो. निसर्गाचं एक अनोखं रूप आपल्याला अनुभवायला मिळतं ते फक्त आणि फक्त या वृष्टीच्या कृपेने. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांमध्ये.1. पाऊस चौफेरकवी - सुधीर मोघेकवितासंग्रह - आत्मरंग2. झाला बेभान पाऊसकवी - नलेश पाटीलकवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
गुलमोहरलालबुंद घोसानी डवरलेला गुलमोहर कोणाला भुरळ घालणार हे अशक्यच. त्याचं ते मोहक रूप, सुंदर रंग, त्याचा लालभडक सडा पाहणं हे उन्हाळ्यातील अतिशय विलोभनीय दृश्य. चला तर आनंद घेऊया या बहरलेल्या गुलमोहराचा.1. गुलमोहर कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम2. गुलमोहर कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - नवा दिवस Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आंबे आणि आंबेचफळांचा राजा, उन्हाळ्यात आपल्या जीवाला थंडावा देणारा, मनामनात आणि पोटापोटात घर करणारा असा हा आंबा. त्याचा सुगंध, रंग, चव काय बहार आणतात ना या रणरणत्या उन्हात. चला तर मग ताव मारुयात आंब्यांच्या कवितांवर.1. आंबेकवी - यमकविता (FB)2. आंबे - पहिली ते दहावीकवी - शंकर वैद्यकवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
झाडांच्या मनातनिसर्गाची सुंदर देणगी म्हणजे झाडं..ही झाडं , पाखरं, आकाश, झरे खूप काही निर्व्याज प्रेमाने देत राहतात. त्यांच्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने करत राहतात. चला तर मग हरवून जाऊया या हिरवळीमध्ये कवितांच्या झुल्यावर स्वार होऊन.1. लपक झपक झाडातूनकवी - ना धों महानोरकवितासंग्रह - पावसाळी कविता2. झाडांच्या मनात जाऊकवी - नलेश पाटीलकवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आशाळभूतआपण सगळेच एक वेडी आशा मनात ठेऊन जगत असतो. आज हे नाही झालं तर उद्या होईल, असा एक दिलासा आपण सारखा एकमेकांना देत असतो. चला तर मग होऊया आशावादी कवितांसोबत.1. आशाळभूत  कवी - वैभव जोशीकवितासंग्रह - म्हणजे कसं की...2. आशावादी कवी - आरती प्रभू कवितासंग्रह - दिवेलागण Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
कोकिळेचा स्वररणरणत्या उन्हात जीवाची लाही लाही होत असताना अशी एक गोष्ट आपल्या मनाला चंदनासारखा थंडावा देऊन जाते ती म्हणजे कोकिळेचा तो मधुर स्वर. सकाळ, संध्याकाळ बहरून जाते तिच्या गोड गाण्याने. अगदी नि: स्वार्थपणे ती हे सप्त सुर आपल्या आयुष्यात भरते. त्यामुळे मन कसं प्रसन्न होऊन जातं. चला तर मग बघुया ही कोकिळा कशी आहे कावितांसोबत.1. कोकीळ  कवी - मो ग लोंढे कवितासंग्रह - बालभारती 2. कोकिळा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - वादळ वेल Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
संवादरोजच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग. स्वतःशी, इतरांशी जोडणारा हा दुवा. कधी उभारी देणारा, कधी जाणून घेणारा, कधी चिडवतो तर कधी आवडतो असा हा संवाद.1. संवादकवितासंग्रह - मुक्तायनकवी - कुसुमाग्रज2. संवादकवितासंग्रह - शब्दकवी - मंगेश पाडगांवकर Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
महाराष्ट्र माझा१ मे १९६० रोजी आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. संत, साहित्य, कला, निसर्ग , संस्कृती यांनी संपन्न असलेलं हे राज्य. आपल्याला खूप काही शिकवतं. मला खात्री आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाटतोच वाटतो. चला तर मग साजरा करूया हा महाराष्ट्र दिन कवितांसोबत.1. नव महाराष्ट्रगीत कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रंग माझा वेगळा 2. धरती महाराष्ट्राची कवी - नारायण सुर्वेकवितासंग्रह - ऐसा गा मी ब्रह्म Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
साधनाकाहीतरी मोठ्या ध्येपूर्तीसाठी साधना तर करावीच लागते. तेव्हा कुठे तो गोष्ट आपल्याला अवगत होते. आपल्या इतिहासात, पौराणिक गोष्टींमध्ये अशी असंख्य उदाहरणं दिसतात. त्यामुळेच त्यांनी अशक्य कामं शक्य करून दाखवली. जर तर मग करूया साधना कवितेची आणि पाहुयात साधना असते तरी काय!1. साधनाकवी - पु शि रेगेकवितासंग्रह - साधना2. साधनाकवी - संदीप खरेकवितासंग्रह - मी अन् माझा आवाज#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
जीवन - मृत्युप्रत्येक जीवाची सुरुवात जन्मापासून होते. हा प्रवास सुरू असतो मरणापर्यंत. कोणी प्रत्येक क्षण जगतो तर कोणी प्रत्येक क्षण मरतो. जगताना जगायचं राहूनच जातं बऱ्याच लोकांचं. उगाच मरणाच्या बाता करत आनंद हिरावून घेतो चालू आयुष्यातला. चला थोडं जगूया कवितेच्या सुंदर जगामध्ये.1. जन्म मृत्यूकवी - ग दि माडगूळकरकवितासंग्रह - पूरिया2. जीवन मृत्यूकवी - वैभव जोशीकवितासंग्रह - म्हणजे कसं की.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
अवयव आपलेआपण खूप साऱ्या अवयवांचा एक अख्खा पुतळा असतो. एक ना एक अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. पण त्यांचा वापर मात्र माणसागणीक बदलत जातो. मग तीच जीभ वापरून गोड बोलणं असेल नाही तर कटू बोलणं असेल. चला तर जाऊया या अवयवांच्या बाजारात1. अवयवकवी - संदीप खरेकवितासंग्रह - मौनाची भाषांतरे2. अवयव आपलेकवी - सौमित्रकवितासंग्रह - बाऊल Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
loading
Comments